कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी
शासन निर्णय लवकरच जारी करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, २७ : बायोटिक ग्रेडेबल नसलेले कुठलेही साहित्य वापरून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. या निर्णयाला अधिक स्पष्टता देण्यासाठी शासन निर्णय काढला जाईल. तसेच, अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि अशा फुलांचा वापर करून सजावट करणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरील कारवाईचा समावेशही या शासन निर्णयात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
कृत्रिम फुले व प्लास्टिकच्या वस्तूंच्या उत्पादन, विक्री व वापरासंदर्भात विधानसभेत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
No comments:
Post a Comment