Thursday, 22 January 2026

महागणेशोत्सवांतर्गत तीन दिवसीय व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार करणार शुभारंभ · विविध विषयांवर नामवंतांची दर्जेदार व्याख्याने

 महागणेशोत्सवांतर्गत तीन दिवसीय व्याख्यानमाला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार करणार शुभारंभ

·        विविध विषयांवर नामवंतांची दर्जेदार व्याख्याने

 

मुंबईदि. २१ : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. याअंतर्गतपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबईसांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने २२२३ व २४ जानेवारी या कालावधीत त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचा शुभारंभ २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

या व्याख्यानमालेंतर्गत २२ जानेवारी रोजी ज्येष्ठ लेखकविश्लेषक व अभ्यासक अच्युत गोडबोले 'ए आय तंत्रज्ञान व कलाविश्व',  २३ जानेवारी रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या युनेस्को नामांकनाचा रोमांचक प्रवासआणि २४ जानेवारी रोजी मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी अभिजात मराठी : इतिहास वर्तमान व भविष्य या विषयांवर संवाद साधणार आहेत.

 

रोज सायंकाळी ६ वाजता अकादमी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात आयोजित या व्याख्यानमालेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या व्याख्यानांचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi