भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री व मंत्री करणार ध्वजवंदन
मुंबई, दि. 21 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
मुंबई येथील प्रमुख समारंभात मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे पालकमंत्री / मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजवंदन करतील.
No comments:
Post a Comment