Wednesday, 21 January 2026

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 

मुंबईदि. २१ : नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएमसुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून३२ देशांतील ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपमनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा आरंभ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागताने होत असूनयावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित असतील.

या परिषदेत ७०हून अधिक देशांतील १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीविविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीभारतातील परदेशी मिशन्स तसेच निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि कार्यरत तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लोकशाहीनिवडणूक व्यवस्थापनआंतरराष्ट्रीय निवडणूक मानकेतसेच निवडणूक प्रक्रियेतील नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.

परिषदेदरम्यान उद्घाटन सत्रइलेक्शन मॅनेजमेंट बॉडी (ईएमबी) लीडर्स प्लेनरीकार्यगट बैठका तसेच विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ विषयक गटांमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी नेतृत्व करणार असूनराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चांमध्ये ४ आयआयटी६ आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसीयांसारख्या अग्रगण्य संस्थांचा सहभाग असणार आहे.

याच वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्र परिषदेचे २०२६ साठी अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्या अनुषंगानेआयआयसीडीईएम-२०२६ मध्ये भारताची समावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही’ ही व्यापक संकल्पना केंद्रस्थानी राहणार आहे.

आयआयसीडीईएम-२०२६ परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi