पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज
मुंबई, दि. 16 : देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत या योजनेची राज्यात 2022 ते 2027 या कालावधीत अंमलबजावणी करण्यात येत असून पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासह सर्व विभागांच्या सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीचा मंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला
No comments:
Post a Comment