Friday, 17 October 2025

कुंभमेळा आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

 कुंभमेळा आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

-         मुख्य सचिव राजेश कुमार

 

मुंबईदि. 16 : राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीतअसे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले.

 

मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

 

मुख्य सचिव राजेश कुमार म्हणालेकुंभमेळा आयोजनासाठी प्राधिकरणास सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे प्राधिकरणाने प्राधान्याची कामे आणि ती पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करावा. त्यानुसार कामांची प्रशासकीय मान्यतानिविदा आणि कार्यादेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कुंभमेळा यशस्वीरित्या पार पडण्याच्या दृष्टीने दळणवळणपरिवहनपाणी पुरवठामलनि:सारणघनकचरा व्यवस्थापनराहण्याची सोयआरोग्य व्यवस्थाविद्युत व्यवस्था आदी महत्त्वाची कामे सर्व संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावीत. यासाठी विभागांनी आणि प्राधिकरणाने विहित मार्गाने निधीची तरतूद होण्यासाठीची प्रक्रिया तात्काळ करावी.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi