तीन जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन निर्माण करणार
पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तू संवर्धन आणि सांस्कृतिक प्रसिद्धी साठी डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून या जिल्ह्यांतील ऐतहासिक स्थळे, मंदिरे, गडकिल्ले यांचा एकात्मिक बृहत् आराखडा स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये या वास्तूंचे जतन, संवर्धन, देखभाल आणि पर्यटन वाढविणे याचा समावेश असेल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपूर्णतः चर्चा करून पुरातत्व विभाग नोडल एजन्सी आणि मित्राच्या मदतीने या विषयाचा एकात्मिक बृहत् आराखडा बनवण्याचे नियोजनाचे निर्देश मंत्री ॲड शेलार यांनी दिले.
पुढील दोन वर्षांमध्ये हे दोन्ही आराखडे एकदा तयार झाल्यानंतर अस्तित्वात असलेले जे आपले पीपीपी धोरण आहे, शासकीय निधी आहे आणि आवश्यकता असेल तर वर्ल्ड बँक आणि एडीबीच्या निधीतून निधी उभारणी कशी करायची, त्याबद्दलसुद्धा मित्रा राज्य शासनाला, आणि पुरातत्व विभागाला मदत करणार आहे. त्यासाठी हा आराखडा आणि बृहृत आराखडा होणे आवश्यक असून नियोजन झालं तरच खासगी निधी किंवा शासकीय निधी किंवा वर्ल्ड बँकचा निधी येऊ शकतो.
हा निधी कसा उभा राहू शकतो याबातचा रोड मॅप येत्या दोन वर्षात आराखडे तयार करीत असतानाच करा, अशा सूचना या बैठकीत मंत्री ॲड.शेलार यांनी दिल्या.
या दोन वर्षांत आराखडा तयार होत असतनाच पहिल्या टप्प्यात ज्या ज्या ठिकाणचा बृहृत आराखडा तयार होईल, त्याबाबत पर्यटन विभागाशी चर्चा करून मार्चपर्यंत पहिल्या 15 मध्ये पाच बारव, पाच मंदिरे आणि पाच किल्ले याचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट करुन त्या कामांना सुद्धा निधी उभारणीला सुरूवात करा अशा सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment