Friday, 17 October 2025

आपला महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा इतिहास, ऐतिहासिक मूल्य असलेल्या

 राज्यातील मंदिरेकिल्ले आणि ऐतिहासिक वस्तू संवर्धनाविषयी मंत्रालयात मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बैठक घेतली. बैठकीला मैत्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीसांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णीपुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गेसांस्कृतिक कला संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, पु. ल. देशपांडे कला अकदामीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपला महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा इतिहासऐतिहासिक मूल्य असलेल्या वास्तूमंदिरेगड-किल्लेबारव हा आपला अभिमान आहे. त्यामुळे जतन संवर्धनाबाबत योग्य नियोजनासाठी बृहत् आराखड्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. त्यामुळे या आराखड्यात राज्य संरक्षित वारसा स्थळांबरोबरच राज्य संरक्षित नसलेल्या ३५० किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात यावा. आराखड्यानंतर प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करावीतसेच खासगी भागीदारी विचारात घ्यावी. गरज असल्यास खासगी भागीदारीसाठी स्वतंत्र धोरणही तयार करण्यात यावेअशा सूचना मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी केल्या.

आराखडा तयार करताना इतिहासवास्तुशास्त्रपुरातत्त्वसंवर्धन आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील तज्ञांची नेमणूक करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुसंगत आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पीआययूयामध्ये चार नवीन अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती जाहिरात करून करणे15 डिसेंबरच्या अगोदर या पद्धतीच्या समितीच्या स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा आज घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi