Tuesday, 16 September 2025

जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार

 जेम्स अँड ज्वेलरीक्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी

अभ्यासक्रम सुरू करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबईदि. 16 'जेम्स अँड ज्वेलरीक्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत 'जेम्स अँड ज्वेलरीक्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर येथे आयोजित जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनाच्या विविध दालनांनाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार चित्रा वाघजेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडेउपाध्यक्ष अविनाश गुप्ता आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi