Tuesday, 16 September 2025

जमीन नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात असून, जागतिक दर्जाचे पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित

 यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळमुख्य सचिव राजेशकुमारअपर मुख्य सचिव (नवि-१) असीमकुमार गुप्ताउर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्लामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमहाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त संजय मीणा आदी उपस्थित होते.

महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा मौजा कोराडीमौजा महादुलामौजा खापरखेडामौजा नांदा (तालुका कामठी) आणि मौजा घोगली ता. नागपूर (ग्रामीण) या भागात आहे. ही जमीन नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात असूनजागतिक दर्जाचे पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. या उपक्रमाचा मुख्य आधार शाश्वत जलकेंद्रित विविध कार्यक्रम आहे. नॉन-मोटरायइड बोटिंग (पॅडल बोट्सकायाक्सकॅनू)पर्यावरणपूरक शिकारा आणि फ्लोटिंग डेक राइड्सफ्लोटिंग प्लॅटफॉर्मवरून पक्ष्यांचे निरीक्षणनिसग पर्यटन हे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत.

प्राधिकरणाला दिलेली जमीन ही नागपूरच्या महत्त्वाच्या शहरी आणि नैसर्गिक संसाधनांच्या जवळ असल्यामुळेजागतिक दर्जाचे पर्यावरण पर्यटन स्थळ म्हणून तिचा विकास केला जाणार आहे. हा उपक्रम पर्यटन उद्योगास चालना देईलस्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देईल व परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास सशक्त करेलप्रकल्प उभारणीत पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईलअशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi