Friday, 19 September 2025

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

 व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र

 त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १७ : शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्गविशेष मागास प्रवर्ग तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नयेयाकरिता ज्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही त्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधावाअसे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचे मुख्य समन्वयकसुनील वारे यांनी केले आहे.

            राज्यात सुरु असलेल्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकीवैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्गविशेष मागास प्रवर्ग व एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिली आहे. तथापिअनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही. संबंधित समित्यांमार्फत एसएमएसईमेल व पत्राव्दारे वारंवार सूचना दिल्यानंतरही अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह समित्यांशी संपर्क साधलेला नाहीअसे दिसून आले आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाहीत्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधून आवश्यक दुरुस्ती करावीअसे आवाहन बार्टीचे महासंचालक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi