स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाद्वारे लोकांची सेवा - मंत्री प्रकाश आबिटकर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहे, त्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाच्या माध्यमातून महिलांची तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि क्षयरोगाची तपासणी केली जाईल, विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी, ॲनिमिया तपासणी आणि समुपदेशनाचे कामसुद्धा केले जाणार आहे. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल तपासणी, कार्ड वाटप आणि समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि तपासणी असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment