मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छीमार्केट
सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे
- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. 20 : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात मरोळ मच्छी मार्केट विषयी बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment