Thursday, 24 July 2025

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार Pl share

 बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत26 लाख स्थलांतरित व

7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार

 

            मुंबईदि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision - SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून7.5 लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे.

            या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असूनयेत्या 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1 लाख बीएलओ (BLO), 4 लाख स्वयंसेवक आणि 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले 1.5 लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.

        आतापर्यंत प्राप्त माहिती :

एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४

प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ,१६,०४,१०२ (९०.६७%)

डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)

पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)

मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)

कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)

दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)

न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)

एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)

अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)

            याबाबत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकतीदुरुस्तीसमावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहेअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi