Thursday, 12 June 2025

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठीचार तात्पुरती बस स्थानके,एसटी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण व चहा नाश्ता

 चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरीभाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागाभिमापांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यानयात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणीसुलभ शौचालयसंगणकीय आरक्षण केंद्रचौकशी कक्ष अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत .

बस स्थानकाचे नाव आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

चंद्रभागा बसस्थानक : मुंबईठाणेरायगडसातारापुणे विभाग व पंढरपूर आगार.

भिमा यात्रा बसस्थानक देगाव : छत्रपती संभाजी नगर नागपूर व अमरावती प्रदेश.

विठ्ठल कारखाना : नाशिकजळगावधुळेअहमदनगर.

पांडुरंग बसस्थानक: सांगलीकोल्हापूररत्नागिरी व सिंधुदुर्ग

 

एसटी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण व चहा नाश्ता

 यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा - नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  प्रताप सरनाईक यांनी दिली.

भाविक-प्रवाशांनीएसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi