पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन
करण्याबाबत शासन सकारात्मक
- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. १७ : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवावा याबाबतची कार्यवाही विभागाने जलदगतीने करावी, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.
मंत्रालयात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.वाय.सी.साळे, डॉ.एस.एस.नारखेडे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment