Tuesday, 27 May 2025

कैदी च्या जिवनात सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका

 सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका

सामाजिक कार्यकर्त्याने कायदेशीर मार्गदर्शन आणि मदतजिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मोफत कायदेशीर साहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी वकीलांशी संपर्क साधणेआरोग्य आणि स्वच्छतामानसिक आरोग्य सेवा आणि समुपदेशनाची तरतूद करणेप्रथमोपचार आणि सामुदायिक आरोग्य विषयक अल्पकालीन प्रमाणित प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेआरोग्यविषय जनजागृती कार्यक्रम आयोजित करणेतुरुंगामध्ये आणि तुरुंगामधून सुटल्यानंतर कल्याणकारी आणि पुनर्वसन सेवांची तरतूद करणे इत्यादी कामे सामाजिक कार्यकर्ते करत असतात.

बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कारागृहातील बंदीच्या विनंतीनुसार व संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कालावधीमध्ये पाच मध्यवर्ती कारागृह व ब्रोस्टल स्कूलनाशिक मधील एकूण 16 हजार 994 बंदींपर्यंत सामाजिक कार्यकर्ते पोहोचू शकले आहे. त्यापैकी 12 हजार 275 हे न्यायाधीन बंदी असून 4 हजार 719 बंदी व ब्रोस्टल स्कूलमधील 26 किशोरबंदीसोबत कार्य करण्यात आले आहे.

या कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कैद्यांची प्राथमिक माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांना समुपदेशनकायदेशीर मार्गदर्शनतसेच उच्च न्यायालयाद्वारे कायदेशीर मदतन्यायालयीन भेटीवकिलांच्या भेटीपीआर बाँडवर सुटका करण्यासाठी साहाय्यजामिनासाठी कुटुंबासोबत पाठपुरावापोलिस स्टेशनला भेटीगृहभेटीकुटुंबामधील व्यक्तींसोबत फोनद्वारे संपर्कनिवारा गृहांचा शोध आणि बंदी मुक्त झाल्यानंतर मुक्त बंदी योजनात्यांच्या मुलांसाठी बाल संगोपन योजना आणि बंदी पुनर्वसन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्यबंद्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणकायदेविषयक सत्रमार्गदर्शन शिबिरवैद्यकीय शिबिरतसेच बंद्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदी सुटल्यानंतर छोट्या व्यवसायासाठी साहाय्यबंदी सुटल्यानंतर गरजू बंदीना प्रवास खर्चबंद्यांच्या कुटुंबासाठी रेशन पुरविणेतसेच बंद्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारी विभाग व स्वयंसेवी संस्थांकडून संसाधने उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi