Thursday, 8 May 2025

राज्यात 16 ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल म्हणजे स्वसंरक्षण

 राज्यात 16 ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

 

मुंबईदि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरकेंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील 16 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले.

 

मुंबई शहरामध्ये क्रॉस मैदान येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. यावेळी सिव्हिल डिफेन्सचे अपर पोलीस महासंचालक प्रभास कुमारगृहरक्षक दलाचे महासंचालक रितेश कुमार आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या  ड्रिलमध्ये पोलीसएनडीआरएफ,  सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवकगृह रक्षक दललोहमार्ग पोलीसस्थानिक स्वराज्य संस्था,  स्थानिक जिल्हा प्रशासनएनएसएस,  एनसीसी यांनी सहभाग घेतला. तसेच अणुशक्ती नगर येथे ब्लॅक आऊट मॉक ड्रिल झाले.

 

राज्यात मुंबईउरण-जेएनपीटीतारापूर,  पुणेठाणेनाशिकथळ-वायशेत,  रोहा-धाटाव-नागोठाणेमनमाडसिन्नरपिंपरी-चिंचवडछत्रपती संभाजीनगरभुसावळ,  रायगड,  रत्नागिरीसिंधुदुर्ग येथे मॉक ड्रिल घेण्यात आले.

 

या ड्रिलमध्ये सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच  हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावायावर विशेष भर दिला गेला. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीटअतिरिक्त औषधेटॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi