Saturday, 19 April 2025

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना गेट व ऑफ इंडिया, मुंबई येथे 20 एप्रिलला कार्यक्रम

 सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना

गेट व ऑफ इंडियामुंबई येथे 20 एप्रिलला कार्यक्रम

 

मुंबईदि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार20 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडियामुंबई येथे एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधासभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकरसांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारलोकसभा सदस्य अरविंद सावंतमुख्य सचिव सुजाता सौनिकअपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकरवैशाली सामंतउर्मिला धनगरआदर्श शिंदेमिलिंद शिंदेनंदेश उमकअवधूत गुप्ते व शाहीर राजा कांबळे हे कलाकार सहभागी होणार असूनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतेनाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असूनसन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातीलअशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi