इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत
२३ ऑगस्ट रोजी मुंबईत मेळावा
मुंबई, दि.२१ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २३ ऑगस्ट २०२४ रोजी किर्ती महाविद्यालय, दादर या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई शहर जिल्हयामधील नागरिकांनी या मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक मुंबई शहर पुष्पलता घटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
No comments:
Post a Comment