Tuesday, 26 March 2024

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

जल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत

 

      


      मुंबईदि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात' 'पाण्याचे नियोजन आणि महत्वया विषयावर जल साक्षरता केंद्रयशदापुणेयेथील माजी कार्यकारी संचालक तथा 'चला जाणूया नदीलाच्या राज्यस्तरीय समितीतील अशासकीय सदस्यजल अभ्यासक डॉ.सुमंत पांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. आपण दैनंदिन कामांसाठी जे पाणी वापरतो त्यातील बहुतांश पाणी भूजलातून येते. आपल्याकडे स्थिर आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक संसाधने खूप महत्वाची भूमिका बजावतात. चांगल्या आरोग्यासाठी गोड्या पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भूजलाचा वापर वाढत असून पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता पडू नयेतसेच भूजल संवर्धनासाठी जगभरात दरवर्षी 22 मार्च रोजी 'जागतिक जल दिनम्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य लक्षात घेता 'पाण्याचे नियोजन आणि महत्वया विषयावर जल अभ्यासक डॉ. पांडे यांनी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात डॉ. पांडे यांची मुलाखत बुधवार दि. 27, गुरुवार दि. 28,  शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहेतर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

00

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi