Thursday, 15 February 2024

राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी सांघिक प्रयत्न करा

 राज्यात मोठ्या क्षेत्रावर बांबू लागवड होण्यासाठी सांघिक प्रयत्न करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

बांबू टास्क फोर्सच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

            मुंबईदि. 14 : राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरिता विविध विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेअसे आवाहन करतांनाच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बांबू लागवड उपयोगी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मंत्रालयात आयोजित पहिल्या बांबू टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंतराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलकृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवअनुपकुमारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेवन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीरोहयो विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे  यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीजगभरात प्रदुषणाची समस्या वाढत आहेवातावरण बदलामुळे पुढील पिढ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पर्यावरण रक्षण आणि ऊर्जा संकटाचा मुकाबला करण्यासाठी बांबू लागवड हा महत्वाचा पर्याय ठरणार आहे. तसेच बांबूची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी बांबू लागवड केल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांनी बांबू क्लस्टर निर्माण करण्याचे आवाहन आपण केले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण आहे. हे धोरण यशस्वी करण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषीवनसामाजिक वनीकरणपर्यावरण यासह सर्व विभागांनी सकारात्मक भावनेतून टीम म्हणून काम करावे. तसेच यासाठी आवश्यक निधी ‘मनरेगा’च्या माध्यमातून रोजगार हमी योजना विभागाकडून उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

            बैठकीच्या सुरुवातीला बांबू लागवडीविषयी सादरीकरण करतांना श्री.पटेल यांनी सांगितले कीराज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000


 

वृत्त क्र. 579


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi