Monday, 25 December 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा –

  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा – उपमुख्यमंत्री

 

बारामतीदि. २४:  नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेली विकासकामे आगामी १०० वर्ष टिकतीलत्यांची कमीकमीत देखभाल दुरुस्ती करावी लागेल अशा दर्जाची कामे करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभागचिल्ड्रन पार्कसेंट्रल पार्कश्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहितेअपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटेउप विभागीय अधिकारी वैभव नावडकरमहावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.

 

कन्हेरी वनविभाग परिसराचा विकास करीत असताना हवामानानुरुप वाढणारीकमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. दोन झाडामधील अंतर समान ठेवावेवृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहीलतलावाच्या कडेला पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल याची दक्षता घ्यावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

 

'चिल्ड्रन पार्क'ची कामे करीत असताना मुलांना रात्रीच्या वेळी चांगली दृश्यमानता राहील याचा विचार करुन वीजेचे खांब बसवावेत. बालकांना केंद्रस्थानी ठेवून परिसराची रंगरंगोटी करावी. पदपथाच्या बाजूला कमी उंचीच्या फुलझाडांची लागवड करावी. विकासकामे करताना पदपथावर स्वच्छता राहीलयाची काळजी घ्यावीअसे श्री.पवार म्हणाले.

 

'सेंट्रल पार्क'ची कामे येत्या दिवाळीअखेर पूर्ण व्हायला पाहिजे. परिसरातील सर्व शासकीय इमारतींसोबत या पार्कसाठी एकत्रित पाणीपुरवठा करण्याचा आराखडा करावा. श्रीमंत बाबू नाईक वाडा व परिसरातील विकासकामातून ऐतिहासिकपारंपरिक वास्तूंचे दर्शन होईलअशी विविध छायाचित्रे भिंतीवर लावावी. त्यावर विविधरंगी प्रकाशझोत टाकून ते अधिक आकर्षक दिसतील अशी व्यवस्था कराअसेही ते म्हणाले.

 

बारामती अधिक स्वच्छसुंदरसुविधायुक्त व्हावी यासाठी नागरिकांनीही या विकास कामांना सहकार्य करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपेजलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळमुख्याधिकारी महेश रोकडेवन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकरबारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातवजय पाटीलबाळासाहेब जाधवकिरण गुजर आदी उपस्थित होते.

 

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi