Wednesday, 11 October 2023

आयुष'चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 आयुष'चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची

दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 

            मुंबईदि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

           राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षणऔषधी द्रव्य विभाग आणि आयुष संचालनालयामार्फत राज्यात 15 सप्टेंबर  ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुर्वेद जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष संचालनालयाच्या वतीने विविध उपक्रम अणि शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहेया मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे याबाबतची माहिती आयुष  संचालक डॉ. घुंगराळेकर यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 11गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. डॉ. प्रज्ञा कापसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi