Sunday, 24 September 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत


मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री









अमित शाह यांनी आज सपत्निक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  


मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.


००

L

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत


मुंबई, दि. 23: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.


यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री.शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिताताई फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, माजी मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.


-----000-----


 


 


वृत्त क्र.3182


 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन


मुंबई, दिनांक २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.


केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, माजी मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


00000


 


वृत्त क्र.3181


 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले


वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन


 


मुंबई, दि. २३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र रा

ऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


०००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi