Tuesday, 15 August 2023

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

 वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

            मुंबई, दि. ११ : राज्यात वैद्यकशास्त्रात समतोल विकास साधणे आणि वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरूपता आणण्यासाठी विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.


            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमार्फत शैक्षणिक सेवा तसेच रुग्ण सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना तसेच विविध उपक्रम शासनस्तरावर राबविण्यात येत आहेत. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्यभरात विविध शिबीरे आयोजित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर नव्याने वैद्यकीय महाविद्यालय आणि बी.एस्सी. नर्सिग हा अभ्यासक्रम सुरू करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करूण देणे, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्तपदांबाबत भरतीचा निर्णय घेणे असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ ' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 17 ऑगस्ट, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi