Monday, 9 August 2021

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील

वीरांना ऑगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन

 

कोरोनाला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन

          मुंबईदि. 9 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिना निमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यागसमर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारीस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना अभिवादन केले आहे. तसेच कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहनही केले आहे.

          मुख्यमंत्री संदेशात म्हणतातमुंबईतील गवालीया टँकवर 'करेंगे या मरेंगेअशी प्रतिज्ञा घेऊन ब्रिटीशांना 'चले जाव..! भारत छोडो !असा निकराचा इशारा देण्यात आला. क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली.  या संग्रामात त्यागसमर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारीस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन करूया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपलं घर- कुटुंबपरिसरवाडी-वस्तीगाव-शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा घेऊयात्यासाठी आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi