Friday, 13 August 2021

 मुंबईत महिलासुलभ विकास योजनांच्या अनुषंगाने

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

 

            मुंबईदि. 12 : मुंबईमध्ये महिलासुलभ सुविधा निर्माण करणेमहिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणेवर्कींग वुमनसाठी हेल्पलाइनरेंटल हाऊसिंग आदी सुविधा निर्माण करणेचाळी आणि झोपडपट्टीमधील  महिलांसाठी सुविधारोजगार आदी संधी उपलब्ध करणेमहिलांसाठी शौचालये अशा विविध अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शहराच्या विकास आराखड्यात महिलासुलभ विकासाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

            बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमारउपायुक्त रमाकांत बिरादारसहाय्यक आयुक्त किरण दिघावकरॲडव्हायझरी कमिटी फॉर जेंडरच्या नंदिता शहाअमिता भिडेप्राची मर्चंटडब्ल्यूआरआयचे धवल आशरतनुश्री व्यंकटरमणआकांक्षा अग्रवाल, earnst & young चे मणी मेहरोत्रारोहित लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील वापरात नसलेल्या जागांचा विकास करणेयाठिकाणी विविध लोकोपयोगी सुविधांची निर्मिती करणे या अनुषंगानेही सादरीकरण करण्यात आले. मुंबई शहराचा सर्वांगिण विकास करताना त्यात महिलांना विविध सुविधांची उपलब्धता होणेसुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे या बाबींवर भर दिला जाईलअसे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेस चालना

            हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतही बैठक घेण्यात आली. राज्याचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा असून समृद्धी महामार्गावर यासाठी चालना देण्यात येत आहे. बैठकीत या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारमहाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सुरज वाघमारेमहावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलएमईआरसीचे श्री. आंबेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi