Wednesday, 18 August 2021

 वांद्रेविलेपार्लेसांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून

नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

--

·       कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 18 : वांद्रेविलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

            एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिरविलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

            मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविडविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री ॲङ अनिल परबआमदार सुभाष सावंतमाजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरनगरसेवक सदा परबशेखर वायंगणकरश्रीमती रोहिणी कांबळेसंदीप नाईकवरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi