Monday, 31 August 2026

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार

 झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही,

तर मूलभूत सुविधाही पुरविणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी: बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया

पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर, दि. ३० : झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि त्याअनुषंगाने झालेले निर्णय या संपूर्ण प्रक्रियेवर सीएफएसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) च्या लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी: बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया' या पुस्तकाचे प्रकाशन 'रामगिरी' येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकीपट्टे मिळणे अतिशय आवश्यक होते. ते दिल्यामुळे त्यांचे जीवन बदलल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांचा सर्वसमावेशक विकास होण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. झोपडपट्टी विकासासाठी हे पुस्तक दिशादर्शक असणार आहे. मी नागपूरचा महापौर असतानाच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे पुढे आमदार म्हणूनही हा विषय लावून धरला. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या पुस्तकाच्या लेखिका लीना बुद्धे यांनीही हा गुंतागुंतीचा विषय अभ्यासपूर्ण मांडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मालकी पट्टे देण्याचा मी निर्णय घेतला. अनेक खासगी जागांवरही झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यांच्या नियमितीकरणासाठीही शासनाने निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेचे या पुस्तकामुळे दस्तावेजीकरण झाले आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लेखिका श्रीमती बुद्धे यांचे अभिनंदन केले.

            नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याची भावना लेखिका लीना बुद्धे यांनी मनोगतात व्यक्त केली. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न हा अतिशय जुना आहे. तो फार कोणी समजून घेतला नाही, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे करून ठोस निर्णय घेतले. त्यामुळे मालकी हक्क मिळण्याचा मोठा आनंद त्या रहिवाशांना मिळू शकला. हा सारा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. नागपूर शहरात १२ ते १५ हजार अशा मालकीपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. हे खूप मोठे कार्य असल्याचे लीना बुद्धे यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, डॉ. सुहास बुद्धे, सीएफएसडीतील डॉ. बुद्धे यांचे सहकारी उपस्थित होते.

Sunday, 30 August 2026

golden hour" right after a cyber fraud is crucial. If a complaint is filed during

 Chief Minister Fadnavis explained that the "golden hour" right after a cyber fraud is crucial. If a complaint is filed during this time, there is a much better chance of freezing or recovering the stolen money. However, if citizens delay reporting it by three to fifteen days, the money gets transferred across multiple accounts and becomes very difficult to recover. Therefore, it is essential to call 1930 immediately upon realizing you have been scammed.

Cybercriminals use various tricks like claiming illegal drugs were found in a parce

 Cybercriminals use various tricks like claiming illegal drugs were found in a parcel or committing OTP fraud through fake phone calls while posing as police or CBI officers. Seeing someone in a khaki uniform or dressed as a police officer or judge on their screen often terrifies ordinary citizens into falling for these scams. Therefore, Mr. Fadnavis urged people not to give in to such pressure or fear under any circumstances.

 

चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 चाकण परिसरातील गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार ; उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढी मोठी गुंतवणूक या भागात अपेक्षित आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत असून, राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

चाकण-भोसरी परिसरातील उद्योजक राज्याबाहेर स्थलांतरित होत असल्याच्या चर्चांना फेटाळून लावत, महाराष्ट्रातील एकही उद्योजक राज्याबाहेर गेलेला नसून उद्योजकांचा महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणावर आणि राज्य शासनावर पूर्ण विश्वास असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी स्पष्ट केले.

Digital arrest' is not real; immediately contact 1930 if you are a victim of cyber fraud.

 Digital arrest' is not real; immediately contact 1930 if you are a victim of cyber fraud.

- Chief Minister Devendra Fadnavis

 

  • Public awareness is the most effective way to prevent cybercrimes.
  • Release of the 'Digital Arrest' cyber awareness short film and the '1930 Maharashtra Cyber Anthem'.

 

Mumbai, 26th: Cybercriminals often trick citizens by threatening them in the name of the police, CBI, or judges. Chief Minister Devendra Fadnavis has urged people not to fall for these tactics and to immediately call the cyber helpline number '1930' if they are scammed.

 

Speaking at an event organized by Maharashtra Cyber at the Sahyadri Guest House, Chief Minister Fadnavis released a short cyber awareness film titled 'Digital Arrest' and the '1930 Maharashtra Cyber Anthem'.

मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन

 मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

‘डिजिटल अरेस्ट’ या ४२ मिनिटांच्या जनजागृती चित्रपटासह विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय असून कलाकार, अभिनेते आणि गायकांच्या माध्यमातून हा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

डिजिटल अरेस्टया ४२ मिनिटांच्या जनजागृती चित्रपटासह विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यापक अभियान राबवून हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi