Saturday, 29 August 2026

डिजिटल पेमेंट करत आहात?*

 *डिजिटल पेमेंट करत आहात?*


प्रत्येक डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी, खालील गोष्टी नक्की तपासा:


✅ ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचे नाव, म्हणजेच लाभार्थ्याचे नाव

✅ तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम


डिजिटल पेमेंट करत राहा, फक्त... थोडे सावध राहा!!


आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा !

WhatsApp सूचना थांबवायला 'stop' लिहा

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी - अन्न

 डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ


· प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि . २९ :- वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे. महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापन यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.


महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणारे प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांचा कार्य गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

 . चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

·         प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, दि . २९ :- वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ.  चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे. महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापन यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा  अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणारे प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांचा कार्य गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, डॉ. पुरंदरे हे केवळ उत्कृष्ट चिकित्सक नसून शिक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १४० हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. आत्मचरित्र म्हणजे केवळ कामांची यादी नसून एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश देणारा डॉ. पुरंदरे यांचा जीवनप्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मंत्री भुजबळ म्हणाले.

प्रा. डॉ. पुरंदरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेले कार्य हे केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून, महिला आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारे असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा लाभ असंख्य रुग्णांना झाला असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले डॉ. पुरंदरे यांनी त्यांच्या कामातून  जगभरात  ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनाचे विविध पैलू समोर येतील असे सांगत त्यांनी पुरंदरे कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.

नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी

 नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ

दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी

 

नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशा दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 

नागपूर येथे व्हीएसपीएम अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे १ हजार १३८ खाटांचे सूसज्ज रुग्णालय आहे.

तर अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेने असे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ८३० खाटांचे रुग्णालय देखील आहे.

या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार निरीक्षण समितीने पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात 

क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार, या योजनेचा पुनर्विचार करून ती अधिक सर्वसमावेशक, तर्कसंगत आणि खेळाडू-केंद्रित

 बदलत्या काळानुसार आणि क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार, या योजनेचा पुनर्विचार करून ती अधिक सर्वसमावेशक, तर्कसंगत आणि खेळाडू-केंद्रित बनवता त्यात अनेक क्रीडा स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया (सर्व प्रकार) स्पर्धेचा यात

 

समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्णबधीर (डेफ), अंध आणि विशेष ऑलिम्पिकसाठी नव्याने स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कर्णबधीर (डेफ) ऑलिम्पिक, आयबीएसए वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप,वर्ल्ड गेम्स, अंध क्रिकेट वर्ल्ड कप, विशेष ऑलिंम्पिक, वर्ल्ड गेम्स फॉर मेंटली चॅलेन्जड, डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप (वरिष्ठ गट) या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांची अट शिथिल करून देशांच्या सहभागानुसार पारितोषिकाची रक्कम ठरवली जाणार आहे. सांघिक प्रकारात १२ देशांचा तर वैयक्तिक प्रकारात १६ देशांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेतील विजयासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम, सांघिक ६ ते १२ देशांचा आणि वैयक्तीक ८ ते १२ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी ५० टक्के रक्कम तर सांघिक ४ ते ५ देशांचा समावेश आणि वैयक्तिकमध्ये ४ ते ७ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी २५ टक्के रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.  यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. याबाबतचा शासन निर्णयही लवकरच काढण्यात येणार आहे.

नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश · राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ

 नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश

·         राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ

 

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्स्, खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास तसेच रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कठोर मेहनत, समर्पण आणि त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने ही पारितोषिक योजना सुधारीत करण्यात आली आहे. यात आता केंद्र शासन आणि इतर क्रीडा-प्रगत राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख (पूर्वी ५ लाख), रौप्यसाठी पाच लाख (पूर्वी ३ लाख) तर कांस्यसाठी तीन लाख (पूर्वी दीड लाख) अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रम ७ लाख,५ लाख, ३ लाख रुपये आणि खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रम ३ लाख,२ लाख,१लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी २२.५० वरून ५० लाख, रौप्यसाठी १५ वरून ३० लाख तर कांस्य पदासाठी ७.५ वरून २० लाख अशी वाढ करण्यात आली आहे.

टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी संदर्भातील स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला. टेनिसच्या चार वेगवेगळ्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला तीन कोटी रुपये तर उपविजेत्यास दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

बॅडमिंटन स्पर्धेतील थॉमस कप, उबर कप, सदीरमन कप या स्पर्धांतील विजयी खेळाडूला ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. हॉकी स्पर्धांत अझलन शाह कप (वरिष्ठ) आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी विजेत्यास ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख आणि सुलतान जोहर कप (कनिष्ठ) विजेत्यास २० लाख तर उपविजेत्यास १० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

खेळाडूंना यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या यथोचित सन्मानाचीही तरतूद यात करण्यात आली. क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूने प्रमाणित केलेल्या मार्गदर्शकांना हे पारितोषिक दिले जाणार आहे. जास्तीत जास्त तीन क्रीडा मार्गदर्शकांना हे पारितोषिक विभागून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक प्रशिक्षण देणाऱ्यास ३० टक्के, कौशल्य विकास करणाऱ्यास ३० टक्के तर अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणाऱ्यास ४० टक्के असे पारितोषिक सूत्र ठरवण्यात आले आहे.

३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची सुविधा

 ३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची सुविधा

नागरिकांना आवश्यक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निदानात्मक सेवांचेही स्पष्ट मानक निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६, १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११०, तर जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या तीन स्तरांवर मिळून ३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांबाबत स्पष्टता झाली आहे. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्य तपासण्या, लिपिड प्रोफाइल, HbA1C, थायरॉईड, पॅप स्मिअर तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे.

Featured post

Lakshvedhi