Tuesday, 11 August 2026

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना

 भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       वरळी सी फेसवर राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई, दि. १० :  भारतीय तिरंगा आज आपण हातात घेतला असला तरी तो आपल्या मनामध्ये आहे. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभावना आपल्या अंतःकरणात आहे. नवभारत घडविण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.तिरंगा यात्रा ही केवळ एक रॅली नसून देशप्रेमाची भावना जागृत करणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सवरॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या विकासाचा आणि नवभारताच्या संकल्पनेचा उल्लेख केला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, सर्वश्री आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मला येथे दोन सागर दिसत आहेत. एक म्हणजे समोर असलेला हिंद महासागर आणि दुसरा म्हणजे भारतीय तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर प्राणांची आहुती दिली आणि देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, तो तिरंगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत सदैव उंच फडकत राहील.

विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याची तसेच

 तीन टप्प्यांत होणार स्पर्धा

द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६ही स्पर्धा दोन महिन्यांच्या कालावधीत तीन टप्प्यांत होणार आहे.

कॅम्पस राउंड :

सहभागी ३० संस्थांमधील विद्यार्थी संघ आपले प्रोजेक्ट सादर करतील. त्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर प्रत्येक संस्थेतील एक विजेता संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरेल.

नॅशनल्स राउंड ११ व १२ सप्टेंबर २०२६ :

३० कॅम्पस विजेते संघ वरिष्ठ सनदी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळासमोर ऑनलाइन पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर करतील. त्यातून सहा अंतिम संघांची निवड करण्यात येईल.

समिट राउंड २८ ते ३० सप्टेंबर २०२६ :

सहा अंतिम संघ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या शिफारसी सादर करतील. अंतिम संघांसाठी महाराष्ट्रात दोन दिवसीय विशेष गव्हर्नन्स इमर्शन व्हिजिटआयोजित करण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना शासन व्यवस्था आणि योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अनुभव घेता येईल.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्योग, उद्योजकता, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. मात्र, महाराष्ट्राला भारताची नवोन्मेषाची राजधानी आणि जगातील आघाडीच्या नवोन्मेष केंद्रांपैकी एक बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी देशातील उत्साही युवा प्रतिभांच्या धाडसी कल्पना, नवे दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेची गरज आहे. द गव्हर्नन्स चॅलेंजच्या अंतिम फेरीतील सर्वोत्तम सहा संघांची मुंबईत सहभागी होणार आहेत.

            समग्रचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल म्हणाले की, ‘द गव्हर्नन्स चॅलेंजही केवळ शासन व्यवस्थेला समर्पित भारतातील पहिली राष्ट्रीय स्पर्धा आहे. देशातील प्रतिभावान पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सार्वजनिक धोरण आणि शासनविषयक आव्हानांशी सखोलपणे जोडणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. सरकारी नेतृत्व आणि क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याची तसेच मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणणारे व्यावहारिक उपाय विकसित करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

नवोन्मेषाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची वाटचाल

 नवोन्मेषाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची वाटचाल

            विकसित भारत २०४७चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जटिल विकासविषयक आव्हानांवर उपाय शोधणारे, उत्पादकता वाढविणारे आणि नव्या आर्थिक संधी निर्माण करणारे नवोन्मेष आवश्यक आहेत. देशातील सर्वात मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांपैकी एक असलेले महाराष्ट्र मजबूत औद्योगिक पाया, सक्षम वित्तीय परिसंस्था, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, विकसित होत असलेली स्टार्टअप परिसंस्था आणि उद्योजकतेची संस्कृती यामुळे या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे.

 

            राज्यातील नवोन्मेष परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण २०२५ अंतर्गत पुढील पाच वर्षांत ५० हजार स्टार्टअप्सना मान्यता देणे आणि १.२५ लाख उद्योजकांना प्रोत्साहन देणे, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार

 महाराष्ट्राला इनोव्हेशन हबबनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६चे चौथे पर्व घोषित

·         ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

·         आरोग्य, कृषी, शहरी विकासासह सहा क्षेत्रांवर उपाय सुचविणार

 

            मुंबई, दि. १० : महाराष्ट्राला इनोव्हेशन हबम्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. द गव्हर्नन्स चॅलेंज टीजीसी २०२६च्या चौथ्या पर्वाची राज्य शासनाने घोषणा केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            भारतातील राज्य शासन व्यवस्थेवर केंद्रित पहिली राष्ट्रीय प्रशासन केंद्रीत केस स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रतिभावान युवा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या नवोन्मेषाच्या भविष्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने, गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने आणि समग्र संस्थेच्या आयोजनातून ही स्पर्धा होणार आहे. देशातील ३० नामांकित बिझनेस आणि पब्लिक पॉलिसी संस्थांमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.

            या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी महाराष्ट्राच्या दीर्घकालीन महत्वाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राला नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी उपाययोजना आणि प्रभावी सूचना सुचविणार आहेत. क्षेत्रनिहाय उपाययोजना विकसित करण्यासाठी सहभागी संघांना आरोग्य, कृषी, नागरी विकास, वित्तीय समावेशन, शासन आणि शिक्षण या सहा प्राधान्य क्षेत्रांपैकी एका क्षेत्राची निवड करावी लागणार आहे.


आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे 12 ऑगस्ट रोजी 'नौसेना स्वरवंदना' कार्यक्रमाचे आयोजन

 आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे

12 ऑगस्ट रोजी 'नौसेना स्वरवंदना' कार्यक्रमाचे आयोजन

            मुंबई, दि. 10 : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आकाशवाणी, मुंबई आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 'नौसेना स्वरवंदना' या संगीतमय कार्यक्रमाचे बुधवार, दि. 12 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे.

            'वंदेमातरम्' गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून  नौदलाच्या पश्चिम कमांडच्या वाद्यवृंदाचे 65 कलाकार एकत्रितपणे ही अनोखी स्वरवंदना साकारणार आहेत.

            नौसेनेतील स्लो मार्च, क्विक मार्च संगीतासह काही देशभक्तीपर गीतांचा या कार्यक्रमात समावेश असून  नौसेनेच्या वाद्यवृंदाची लयबद्ध, सुरेल अनुभूती यातून प्रेक्षकांना निश्चितपणे मिळू शकेल.

            संगीताचे सूर हे जनमानसासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात. स्वातंत्र्य लढ्यात समरगीते आणि देशभक्तीपर गीतांनी जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. देशभक्तीपर समूहगीतांच्या माध्यमातून आकाशवाणीनेही ही परंपरा मागील अनेक दशकांपासून जपली आहे. नेव्हल बँड अर्थात नौसेना वाद्यवृंद देखील हेच कार्य  अनेक वर्षांपासून करीत आहे.

            मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या भव्य रंगमंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रभक्तीच्या या सुरेल सोहळ्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

००००

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यास १३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. १० : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)-२०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत ११ ऑगस्टऐवजी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. संकेतस्थळावरील भार लक्षात घेऊन उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असून, उमेदवारांनी वाढीव मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

            पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि ते लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय १ लाख १० हजार ७६५, तर मुलाखतीसह ९२ हजार ८९४ उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. यापैकी मुलाखतीशिवाय १९ हजार ४४५ उमेदवारांनी तर मुलाखतीसह ७६७२ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.

            पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी किंवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार लॉगिन करीत असल्याने ओटीपी मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ओटीपी न मिळाल्यास काही काळ प्रतीक्षा करावी आणि तातडीने रिसेंडवर क्लिक करू नये. उशिराने आलेला ओटीपीही स्वीकारला जातो. काही काळानंतरही ओटीपी न मिळाल्यास रिसेंडपर्यायाचा वापर करता येईल.

            ओटीपी मिळण्यात अडचण येणाऱ्या उमेदवारांनी वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री आणि कॅशे क्लिअर करावी. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास इन्कॉग्निटो विंडोकिंवा प्रायव्हेट विंडोचा वापर करावा.

            आदिवासी विकास विभागाच्या उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान शाखेच्या बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्राधान्यक्रम इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना विभागाच्या ८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यभर प्रत्येक विभागात लोककलांचा महोत्सव करणार

 राज्यभर प्रत्येक विभागात लोककलांचा महोत्सव करणार

-         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

            मुंबई, दि. १० : सध्या विविध लोककलांचे महोत्सव सुरु असून यापुढील काळात राज्याच्या सर्व विभागात भव्य स्वरुपात लोककला महोत्सव आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.

            अखिल भारतीय लोककलावंत, मराठी तमाशा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा सन्मान सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आला. तर मंत्री शेलार यांचाही लोककलावंताच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला. लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांच्या उपस्थितीत व तमाशा परिषद अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला वसंतराव जगताप, खंडूराज गायकवाड, गणेश चंदनशिवे, आविष्कार मुळे, शेषराव गोपाळ, सुनील वाडेकर यांच्यासह राज्यभरातून विविध कला सादर करणारे लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            यावेळी तमाशा परिषदेतर्फे पठ्ठेबापूराव यांच्या नावे मरणोत्तर पुरस्कार योजना सुरु करुन लोककलेतील दिवंगत कलावंताना मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावे, विठाबाई नारायणगावकर स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, पेंशन योजना तसेच इतर बाबी तपासण्यासाठी  शासनाने एक समिती गठीत करावी, ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारी याबाबत नियुक्त अभ्यास गटाच्या अहवालानुसार शासन निर्णय काढण्यात यावा व काही जिल्ह्यात तमाशाला पोलिसांकडून परवानगी नाकारली जाते त्याबद्दल पोलिसांना सूचना देण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन मंत्री ॲड शेलार यांना देण्यात आले. त्यावर येत्या पंधरा दिवसात बैठक करुन चर्चा करुन योग्य निर्णय करु, असे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील लोककला व लोककलावंत यांच्या कार्याचा गौरव केला.

Featured post

Lakshvedhi