Tuesday, 28 July 2026

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत त्वरित उपलब्ध करून

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत त्वरित उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा प्राधान्याने पूर्ववत कराव्यात. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावे.

पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावावसई-विरार परिसरात अतिवृष्टीत पाणी साठवणारे 'होल्डिंग स्पॉट' § आपत्तीच्या काळातही अखंडित वीज पुरवठ्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन'

 पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

§  मित्राच्या माध्यमातून एमआरडीपी

§  वसई-विरार परिसरात अतिवृष्टीत पाणी साठवणारे 'होल्डिंग स्पॉट'

§  आपत्तीच्या काळातही अखंडित वीज पुरवठ्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन'

 

मुंबई, दि. 28 : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल या दृष्टीने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा (कोकण व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरिश्चंद्र भोये, आ.विनोद निकोले, आ. राजेंद्र गावित, आ. विकास तारे, आ.राजन नाईक, आ. देवयानी फरांदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पर्यटनाचे प्रभावी ब्रँडिंग करा

 आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पर्यटनाचे प्रभावी ब्रँडिंग करा

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख केवळ राज्य आणि देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आधुनिक मार्केटिंग, डिजिटल ब्रँडिंग आणि प्रभावी प्रचारावर भर देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

 

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२५-२६ मधील मार्केटिंग व ब्रँडिंग कामकाजाचा आढावा तसेच २०२६-२७ च्या कृती आराखड्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडची वैशिष्ट्ये

 पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडची वैशिष्ट्ये

·         प्रकल्पाचा एकूण खर्च २५,१५९.८८ कोटी

·         प्रकल्पाचे टप्पे टप्पा १ - सोळू इंटरचेंज ते वडगाव शिंदे (मनपा हद्द) (४.७० किमी लांबी), लोहगाव (मनपा हद्दीपासून) ते वाघोली (७.५६ किमी).

·         टप्पा २ वाघोली ते कदमवाक वस्ती (९.३६ किमी लांबी)

·         टप्पा ३ कदमवाक वस्ती ते जांभूळवाडी (२१.४८ किमी)

·         टप्पा ४ जांभूळवाडी ते भूगाव (१४.२१ किमी)

·         टप्पा ५ भूगाव ते परंदवाडी (२५.८० किमी)

उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) वैशिष्ट्ये

 उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) वैशिष्ट्ये


· एकूण अंदाजे ३६ किमी लांबीचा सहा पदरी उन्नत मार्ग


· पुणे शहरातील मध्यवर्ती नागरी भागातून जाणार


· प्रकल्पाचा अपेक्षित खर्च – बांधकाम खर्च सुमारे ९ हजार कोटी, भूसंपादनासाठी खर्च सुमारे ३ हजार कोटी


· सार्वजनिक वाहतुकीशी एकात्मीकरण करणार


· एचसीएमटीआरमधील पॅकेज - बोपोडी ते सिंहगड रस्ता (१०.५ किमी), सिंहगड रोड ते सोलापूर रोड (१३.२ किमी), सोलापूर रोड ते एअरपोर्ट चौक (१०.२१ किमी), एअरपोर्ट चौक ते बोपोडी (९.१७ किमी).


 

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे

 पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी- भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून यामध्ये ४४ गावांचा

 पीएमआरडीएद्वारे राबविण्यात येणारा अंतर्गत रिंग रोड हा प्रकल्प ८३.१२ किमीचा असून यामध्ये ४४ गावांचा समावेश आहे. या अंतर्गत रिंग रोडचे काम पाच टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची प्रक्रिया येत्या सहा ते सात महिन्यांत पूर्ण करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रोख मोबदला देऊन रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Featured post

Lakshvedhi