Tuesday, 28 July 2026

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे

 पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाताळलोक प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात तीन ठिकाणी बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये भोसरी ते उंड्री नवीन विमानतळ (३६ किमी यामध्ये १० किमी एलिव्हेटेड), रामनदी- भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या बोगद्यांचे प्रस्तावित आहे. या बोगद्यांच्या जाळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची अथवा तज्ज्ञांची मदत घेऊन सर्वंकष सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi