पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§ ‘मित्रा’च्या माध्यमातून एमआरडीपी
§ वसई-विरार परिसरात अतिवृष्टीत पाणी साठवणारे 'होल्डिंग स्पॉट'
§ आपत्तीच्या काळातही अखंडित वीज पुरवठ्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन'
मुंबई, दि. 28 : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल या दृष्टीने पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा (कोकण व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरिश्चंद्र भोये, आ.विनोद निकोले, आ. राजेंद्र गावित, आ. विकास तारे, आ.राजन नाईक, आ. देवयानी फरांदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment