Monday, 20 July 2026

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे. या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने कानडा राजा पंढरीचाया विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.

            या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन;

 कानडा राजा पंढरीचामधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन;

 

            मुंबई, दि. २० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त कानडा राजा पंढरीचाया विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.

            कानडा राजा पंढरीचाहा महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा सुरेल आविष्कार आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगसंगीत यांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाच्या भक्तीभावात रसिकांना चिंब करणारा हा विशेष सांगीतिक सोहळा ठरणार आहे.

            या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सचिन सावंत, अथर्व आठल्ये, संतोष दिवेकर, अमित गोठीवरेकर आणि संदीप कुलकर्णी हे वादक कलाकार कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत.

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच

 मंत्री सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने 'अनुवाद समिती' स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


‘वन नेशन, वन ॲप्लीकेशन' संकल्पनेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

 

‘वन नेशन, वन ॲप्लीकेशन' संकल्पनेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल...

मुंबई, दि.  16 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन, वन ॲप्लीकेशन' या संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधिमंडळात नेवा (नॅशनल ई-विधान ॲप्लीकेशन) ही संगणकीय कार्यप्रणाली स्वीकारण्याबाबत विधान भवन, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक व सादरीकरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या, यापूर्वीच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, नेवा कार्यप्रणाली अनुसरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यासंदर्भातील पुढील कार्यवाही या बैठकीत करण्यात आली.

बैठकीस डॉ. सत्य प्रकाश, संसदीय कार्य मंत्रालय, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव, जितेंद्र भोळे, सचिव (1) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, शिवदर्शन साठ्ये सचिव (4), सुप्रिया धावरे, सचिव, संसदीय कार्य विभाग, मंत्रालय


महाकेअर कंपनीमार्फत विकेंद्रीत सेवा प्रणालीद्वारे कर्करोर उपचार पद्धतीत परिवर्तन

  महाकेअरची व्याप्ती

- महाकेअर कंपनीमार्फत विकेंद्रीत सेवा प्रणालीद्वारे कर्करोर उपचार पद्धतीत परिवर्तन होणार आहे.

- याअंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्वोच्च संशोधन व कर्करोग उपचार केंद्र,

- मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक व अमरावती येथे जिल्हास्तरीय सर्वसमावेश कर्करोग उपचार केंद्रे

- मुंबई (कामा आल्ब्लेस), रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई (बीड), ठाणे व शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रांची उभारणी

- महाआरोग्य प्रकल्प माध्यमातून राज्यव्यापी अंमलबजावणी

महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीची स्थापना

 महाकेअर अंतर्गत नागपूमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीची स्थापना करण्यास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.  महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 100 कोटी रुपये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारण्यास व स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी जी.टी.रुग्णालय येथील इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती करणे, सल्लागार नेमणे आदी विषयांनाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून

 आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्य-शासित एल 2 व एल 3 कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करुग्णांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाकेअरसाठी मनुष्यबळ उभारताना उच्च दर्जाची क्षमता असलेले मनुष्यबळ घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.


Featured post

Lakshvedhi