Monday, 20 July 2026

कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात

 कर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट उपकंपनी स्थापन करणार

 

मुंबई, दि. 16 : राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम २२ ते २८ जुलै या कालावधीत

 आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम

२२ ते २८ जुलै  या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई (जेजे,जी.टी), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर,नागपूर इ.गा.शासकीय, गोंदिया, आंबाजोगाई, लातुर,सातारा, अलिबाग, नाशिक या महाविद्यालयांमध्ये २२ ते २४ जुलै या कालावधीत स्तन कर्करोग तपासणी शिबिर,  २५ ते २७ गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर, २२ ते २४ जुलै रोजी बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी शिबिर, २२ ते २५ जुलै रोजी नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबीराचे २२,३१ जुलै ते १ ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे.

शासकीय दंत महाविद्यालये, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे २२ ते २८ जुलै रोजी  मुख कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, 'महा आरोग्य शिबिर' हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख उपक्रम असून प्रत्येक अधिष्ठात्याने वैयक्तिक लक्ष देवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी. राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शासनाच्या सर्वच विभाग समन्वयाने अमली पदार्थांशी निगडित

 शासनाच्या सर्वच विभाग समन्वयाने अमली पदार्थांशी निगडित संपूर्ण अर्थव्यवस्थेवर कारवाई करता येईल. अमली पदार्थांचा पुरवठा करणारे पेडलर यांना शोधून त्यांच्याकडून पुरवठा साखळीची मागील आणि पुढील लिंकजेस शोधून काढत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अमली पदार्थांची विक्री होत असलेली ठिकाणे शोधून त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावे. कुणीही या व्यवसायाशी निगडित असल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या माध्यमातून संबंधित शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करावी. संबंधित प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी आपल्या शैक्षणिक आस्थापनेचा कॅम्पस अमली पदार्थ मुक्त घोषित करण्यासाठी नियमावली बनविण्यात यावी. अमली पदार्थ विषयक गुन्ह्यांमध्ये एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट) सारख्या कायद्यांचा प्रभावी उपयोग करीत गतीने निकालाचे कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी. शासनाच्यावतीने अशा प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.


नशेच्या दुर्दैवी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या

 नशेच्या दुर्दैवी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी नशामुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या समन्वयातून नशा मुक्ती केंद्र उभारण्यात यावीत. मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिकेने अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या सहकार्याने स्वतंत्र बहुशाखीय नशा मुक्ती केंद्रांची सुविधा सुरू करावी. त्यासोबतच राज्यामध्ये मोठी रुग्णालय, सर्व शासकीय रुग्णालय यामध्ये काही खाटांच्या मर्यादेत नशा मुक्ती केंद्र सुरू करावे. नशा मुक्त झालेला व्यक्ती पुन्हा नशेच्या गर्तेत जाऊ नये यासाठी मुक्ती केंद्रांची साखळीच राज्यामध्ये तयार करावी.

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक

 सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•        अमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाका

•        अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना व कृती योजनेबाबत बैठक

•        इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात अमली पदार्थ दुष्परिणामांचा समावेश करा

 

मुंबई, दि. १६ : नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, खरेदी - विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या   अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याचे निर्देश देत सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे अमली पदार्थ संदर्भातील आयोजित बैठकीत सांगितले.

शालेय जीवनापासूनच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये अमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानिक युवकांना रोजगार या तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समतोल

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कोणत्याही ॲग्रीगेटर कंपनीने राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे अपरिहार्य आहे. शासनाचा महसूल वाढविणारे, प्रवाशांचा विश्वास दृढ करणारे, चालकांचे हित जपणारे, स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि भाडे व्यवस्थेत पारदर्शकता आणणारे हे धोरण राज्याच्या वाहतूक क्षेत्रात सकारात्मक आणि दूरगामी बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानिक युवकांना रोजगार या तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समतोल साधत महाराष्ट्रात सुरक्षित, जबाबदार, आधुनिक आणि शाश्वत ॲग्रीगेटर सेवा व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे धोरण एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे," असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi