आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम
२२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई (जेजे,जी.टी), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर,नागपूर इ.गा.शासकीय, गोंदिया, आंबाजोगाई, लातुर,सातारा, अलिबाग, नाशिक या महाविद्यालयांमध्ये २२ ते २४ जुलै या कालावधीत स्तन कर्करोग तपासणी शिबिर, २५ ते २७ गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर, २२ ते २४ जुलै रोजी बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी शिबिर, २२ ते २५ जुलै रोजी नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबीराचे २२,३१ जुलै ते १ ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे.
शासकीय दंत महाविद्यालये, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे २२ ते २८ जुलै रोजी मुख कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, 'महा आरोग्य शिबिर' हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख उपक्रम असून प्रत्येक अधिष्ठात्याने वैयक्तिक लक्ष देवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी. राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
No comments:
Post a Comment