Sunday, 21 June 2026

महिला उद्योजकता स्टार्ट अप हब राज्यातील स्टार्ट अप

 महिला उद्योजकता स्टार्ट अप हब राज्यातील स्टार्ट अप परिसंस्थेमध्ये समन्वय साधणारे व्यासपीठ म्हणून काम करेल. शासनाच्या विविध विभाग, परिसंस्था भागीदार आणि सहाय्यक संस्थांना एकत्र आणून महिला उद्योजकांसाठी संधींचे मार्ग अधिक सक्षम करण्याचे काम या हबद्वारे केले जाईल. महाराष्ट्रातील महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी अ‍ॅक्सेलरेटर मॉडेलतयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अ‍ॅक्सेलरेटरच्या माध्यमातून मार्गदर्शन, उद्योग क्षेत्राची गरज, वित्तपुरवठ्याची उपलब्धता, बाजारपेठीय दुवे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधून उदैती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीला तांत्रिक सहाय्यही देणार आहे.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार

 महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 19 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात महिला उद्योजकता स्टार्ट अपहब स्थापन होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या कराराअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन तांत्रिक व ज्ञान भागीदार म्हणून कार्य करणार आहे. महिलांना उद्योजकांना वित्तपुरवठा, बाजारपेठ व व्यवसाय सहाय्यदेखील मिळवून देण्यात येणार आहे.  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यामुळे चालना मिळणार असून महिला उद्योजकांच्यादृष्टीने उत्साही वातावरण तयार होण्यास मदत होईल.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा सामंजस्य करार झाला आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि उदैती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा शर्मा गोयल यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद! सर्वांना ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच प्रवेश...

 विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!

सर्वांना ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच प्रवेश...

 

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून, २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन  प्रवेशासाठी प्रथमच एकही  प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे ‘चेहरा पडताळणी पध्दती’ अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली. विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा.राम शिंदे आणि विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲड. श्री.राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अत्यंत काटेकोर स्वरूपात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

            अधिवेशनकाळात विधान भवन परिसरामध्ये होणारी गर्दी नियंत्रित असावी तसेच सुरक्षा यंत्रणेला तपासणी संदर्भात सुलभता असावी या दृष्टीने या पावसाळी अधिवेशनात छापील प्रवेशपत्राऐवजी ‘चेहरा पडताळणी पध्दती’ राबविण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य सर्व संबंधित आस्थापना, वार्तांकनासाठी येणारे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, भा.प्र.से. तसेच भा.पो.से. आणि अन्य सर्व अधिकारी कर्मचारी, सचिव-विशेष कार्य अधिकारी, सर्व स्वीय सहायक अशा सर्वांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयातर्फे सूचित करण्यात आले आहे. ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरूपात माहिती पाठविणे, आवश्यक ती माहिती ई-मेलवर प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू झाली असून ती दिनांक २० व २१ जून, २०२६ रोजी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने जारी केले आहे. सर्वांनी या नव्या प्रवेशपास प्रणालीचा स्वीकार करावा आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे.

नागपूर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल

 नागपूर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण क्षेत्रात भारताची वाढती ताकद जगभरात मान्य होत असून केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देश जागतिक संरक्षण उत्पादन निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल. विदर्भात विशेषतः नागपूरचा परिसर हा डिफेंस मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिममध्ये देशाचे एक महत्वाचे अंग म्हणून विकसित होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

आत्मनिर्भरतेकडे देशाने एक सक्षम पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत असे दोन मंत्र आपल्याला दिले आहेत. विकसित भारताकडे वाटचाल करायची असल्यास आत्मनिर्भर भारत विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशाने आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

आज संपूर्ण जग आपल्या देशाची प्रगती पाहून आश्चर्यचकित झाले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात अत्यंत कमी वेळात प्रगती केली असून संरक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा उत्पादक देश झाला आहे. विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये साऱ्या जगाने देशाची सामरिक क्षमता पाहिली आहे. हा नवा भारत असून पूर्ण क्षमतेने व आत्मनिर्भरतेने उभा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे आभार अंबाझरी आयुध निर्माणीचे कार्यकारी संचालक अजयकुमार येरपुडे यांनी मानले.

0000

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्णय

 आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवत

वाढदिवस साजरा न करण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्णय

मुंबई, दि.  21 : कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी  संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा 23 जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक संकटांचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे  मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी म्हटले आहे. समाजातील दुःख आणि अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात त्यांनी सर्व हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये; त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात आणि परिसरात समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.

विशेषतः 'गो-सेवा' आणि गौसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करताना मंत्री राणे म्हणाले की,  गौमातेची सेवा, गोशाळांना मदत, जनावरांच्या संगोपनासाठी योगदान तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. गरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रम हेच वाढदिवस साजरा करण्याचे खरे स्वरूप आहे.

कोकणातील बागायतदारांचे नुकसान, मच्छिमार बांधवांच्या अडचणी आणि राज्यातील  पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक आनंदोत्सव साजरा न करणे आवश्यक आहे. जनतेच्या दुःखात सहभागी होणे आणि सेवाभावातून समाजकार्यात योगदान देणे हिच माझ्यासाठी सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल, असे मंत्री राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

तुमचा सेवाभाव हिच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी सर्वांना समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वीच साध्य होईल, असा विश्वास

 संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, २०१४ मध्ये देशांतर्गत संरक्षण उत्पादन सुमारे ४६ हजार कोटी रुपये होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विक्रमी १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यातही २०१४ मधील एक हजार कोटींवरून वाढून ३८ हजार ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांसाठी निश्चित केलेले तीन लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि ५० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वीच साध्य होईल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ कार्यक्रमांसाठी हलके, मजबूत आणि अत्यंत प्रतिकूल

 आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ कार्यक्रमांसाठी हलके, मजबूत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकणारे धातू आवश्यक असतात. अशा धातूंची निर्मिती विशेष प्रक्रियेद्वारे केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करून संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशात देशात विकसित झालेल्या संरक्षण उपकरणांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.  मोठ्या यंत्रणांची खरी ताकद हजारो लहान-मोठ्या घटकांमध्ये दडलेली असते. अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेसमुळे या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होईल, असे ते म्हणाले.

 

Featured post

Lakshvedhi