आधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि अंतराळ कार्यक्रमांसाठी हलके, मजबूत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकणारे धातू आवश्यक असतात. अशा धातूंची निर्मिती विशेष प्रक्रियेद्वारे केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद करून संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशात देशात विकसित झालेल्या संरक्षण उपकरणांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मोठ्या यंत्रणांची खरी ताकद हजारो लहान-मोठ्या घटकांमध्ये दडलेली असते. अॅल्युमिनियम एक्स्ट्रूजन प्रेसमुळे या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होईल, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment