Monday, 15 June 2026

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

 

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई, दि. १४ : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

 

मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.

 

मंत्री श्री.राठोड म्हणाले की,  राज्यातील तलावांमध्ये, बंधारे व धरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. ते नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल आणि शेतकरी सुखी होईल.

 

यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात

 यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून शाळा प्रवेशोत्सव कक्षस्थापन करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार आहेत.

 

शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. शाळा प्रवेशोत्सव 2026 हा उपक्रम विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते अधिक दृढ करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाढती उपस्थिती आणि सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू असून त्याद्वारे शिक्षणसमृद्ध महाराष्ट्रघडविण्याच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले जात आहे.

शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी परिसरातील अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेट

 शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी परिसरातील अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी, पालकांशी संवाद साधावा आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा, शिष्यवृत्ती, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि पालकांच्या व्हॉट्सॲप गटांद्वारेही शाळा सुरू होण्याबाबत व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.

 

यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून शाळा प्रवेशोत्सव कक्षस्थापन करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार आहेत.

 

शाळा प्रवेशोत्सवांतर्गत प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

 शाळा प्रवेशोत्सवांतर्गत प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. पहिले पाऊलया संकल्पनेअंतर्गत  इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे.

 

या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे असून संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा वर्षभरासाठी दत्तक शाळाम्हणून स्वीकारून तेथील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा आहे. यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सवासाठी व्यापक नियोजन केले असून

 शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सवासाठी व्यापक नियोजन केले असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राज्यभरातील विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

 

मागील वर्षी राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवामुळे शाळांमधील पटसंख्येतील घट कमी होण्यास मदत झाली. काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पटसंख्येत वाढही दिसून आली. या सकारात्मक परिणामांच्या आधारे यंदा अधिक व्यापक आणि परिणामकारक पद्धतीने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

 शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : शाळा प्रवेशोत्सव

 

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळा प्रवेशोत्सवमोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल. यासाठी विदर्भातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात यंदाचा शाळा प्रवेशोत्सव 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जल सुरक्षा के लिए व्यापक उपाय

 जल सुरक्षा के लिए व्यापक उपाय

जल सुरक्षा पहल के अंतर्गत 1.06 अरब लीटर मीठे पानी के भंडारण की क्षमता विकसित की गई है तथा सूखा प्रभावित क्षेत्रों में 45 वाटर एटीएम स्थापित किए गए हैं। मराठवाड़ा और विदर्भ के गांवों सहित राज्य के 271 गांवों में जल सुरक्षा को मजबूत किया गया है। साथ ही 8 हजार से अधिक किसानों को जल संरक्षण उपायों और जलवायु-अनुकूल कृषि तकनीकों के लिए सहायता प्रदान की गई है। जलवायु परिवर्तन के प्रभावों को कम करने की दिशा में 7 लाख वृक्षों का रोपण एक महत्वपूर्ण उपलब्धि सिद्ध हुआ है।

Featured post

Lakshvedhi