यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार आहेत.
शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. शाळा प्रवेशोत्सव 2026 हा उपक्रम विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते अधिक दृढ करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाढती उपस्थिती आणि सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू असून त्याद्वारे ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले जात आहे.
No comments:
Post a Comment