Monday, 15 June 2026

शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’

 शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : शाळा प्रवेशोत्सव

 

राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळा प्रवेशोत्सवमोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल. यासाठी विदर्भातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात यंदाचा शाळा प्रवेशोत्सव 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi