शाळा प्रवेशोत्सवांतर्गत प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. ‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे असून संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा वर्षभरासाठी ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तेथील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा आहे. यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment