Monday, 8 June 2026

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

 कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

·         आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

·         विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.


किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी · मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

·         मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही;

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि. 7 : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज 

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

 जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त

दिलखुलास कार्यक्रमात डॉ. प्रियांका धायतडक यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जे.जे. रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका धायतडक यांनी दृष्टिदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध गैरसमजांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. ९ जून आणि बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत न्युज ऑन AIR या ॲपवर देखील प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदिका हर्षदा कुलकर्णी यांनी केले आहे.

            दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान देणगी असून अनेक व्यक्ती कॉर्नियाच्या अंधत्वामुळे दृष्टीपासून वंचित राहतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्यासाठी दृष्टिदान ही अत्यंत महत्त्वाची आणि समाजोपयोगी चळवळ आहे. अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे, यासाठी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो.

त्याअनुषंगाने 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. धायतडक यांनी दृष्टिदान म्हणजे नेमके काय, नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते, कोण व्यक्ती नेत्रदान करू शकते, तसेच नेत्रदानाबाबत समाजात असलेले विविध समज-गैरसमज यावर सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय मृत्यूनंतर अल्पावधीत नेत्रदान करण्याचे महत्त्व आणि त्यातून अंधत्वग्रस्त व्यक्तींच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

000

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

 आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

·         खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपूर, दि. 7 : नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

ज्या भागातून शेतीमालाची आवक होते त्या भागातील शेतकरी प्रतिनिधी निवडणुकीतून

 सध्याच्या बाजार समित्यांची रचना प्रामुख्याने स्थानिक प्रतिनिधित्वावर आधारित आहे. ज्या भागातून शेतीमालाची आवक होते त्या भागातील शेतकरी प्रतिनिधी निवडणुकीतून बाजार समितीवर निवडून येतात. परंतु मुंबई, नागपूर, नाशिक किंवा पुणे यासारख्या मोठ्या बाजारांमध्ये अनेक राज्यांमधून कृषी माल विक्रीसाठी येतो. अशा परिस्थितीत केवळ स्थानिक प्रतिनिधित्व पुरेसे ठरत नाही. त्या बाजाराशी संबंधित इतर राज्यांतील शेतकरी आणि व्यापार घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व गरजेचे आहे.

पणन हा राज्य सूचीतील विषय असल्यामुळे परराज्यातील शेतकरी प्रतिनिधींना निवडणुकीद्वारे बाजार समितीवर आणणे शक्य नाही. ही मर्यादा दूर करण्यासाठी राष्ट्रीय बाजार कायद्यात नामनिर्देशित संचालक मंडळाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही मोठ्या बाजारांसाठी तज्ज्ञ, अधिकारी, व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी आणि इतर राज्यांतील सदस्यांचा समावेश असलेले संचालक मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली होती.

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी मुंबई आणि नागपूर राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अस्तित्वात

 राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी मुंबई आणि नागपूर राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अस्तित्वात

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन घडवणारा राष्ट्रीय महत्वाचा बाजार (Market of National Importance) कायदा हिवाळी अधिवेशनात संमत झाल्यानंतर आता मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' घोषित करण्यात आले आहेत. कायद्यानुसार पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दोन्हीही राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. हा कायदा राज्यातील पणन व्यवस्था अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक संसाधनांनी सुसज्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक दर मिळवून देण्यासाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

शेतकरी हित, बदलती अत्याधुनिक पणन व्यवस्था, वेगाने पुढे जाणारी जागतिक अर्थव्यवस्था आणि आधुनिक कृषी व्यापाराच्या गरजा लक्षात घेतल्या तर हा कायदा काळाची गरज असून सक्षम पणन सुधारणाचा नवा अध्याय आहे असे या कायद्याच्या उद्देशातून स्पष्टपणे दिसून येते.


स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार · जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर ·

 स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार

·         जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

नागपूर, दि. ७ : नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासगटाने या मसुद्याचे सादरीकरण केले. यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे तज्ज्ञ तसेच स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींचा प्रामुख्याने समावेश होता. अभ्यासगटाने प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक शिफारसी सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्फोटकांच्या निर्मिती प्रक्रियेतील जोखीम कमी करण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात स्वयंचलित करण्यात यावी व त्यासाठी रोबोट्सचा वापर करावा, प्रत्यक्ष जोखमीच्या प्रक्रियेच्या जागी कमीतकमी मनुष्यबळ उपस्थित राहील, हे सुनिश्चित करावे, तसेच त्यासाठी सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा आधार घेण्यात यावा, या प्रमुख शिफारसींचा समावेश आहे. या शिफारसींना अनुसरून स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेऊन स्फोटकांशी संबंधित नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचे सूतोवाच केले होते. याअनुषंगाने अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वातील अभ्यासगटाने यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा करून नियमातील प्रस्तावित सुधारणांचा एक मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावित मसुद्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरण केले. यावेळी अभ्यासगटाचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक ए.आर. सोनटक्के, सहाय्यक संचालक गगन उपाध्याय आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000

Featured post

Lakshvedhi