Sunday, 7 June 2026

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

 किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

·         मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही;

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई, दि. 7 : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

·         आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

·         विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे

नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

 नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 5 : 'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी  पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे.  सर्व  यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये,  यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात आयोजित बैठक झाली. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सहसचिव संतोष खोरगडे, राज्य सूचना विज्ञान अधिकारी सपना कपूर, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचे नियंत्रण करावे, तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.  परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी, तसेच परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मानत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) महासंचालक अभिषेक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे नीट महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांची संख्या, उपलब्ध सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी दिली.

००००

रेक्स इंटरनॅशनल कंपनीचा मिथेनॉल परवाना रद्द ३ लाख ६० हजार किमतीचा संशयित मेथॉनाल साठा जप्त, गाळा सील

 रेक्स इंटरनॅशनल कंपनीचा मिथेनॉल परवाना रद्द

३ लाख ६० हजार किमतीचा संशयित मेथॉनाल साठा जप्त, गाळा सील

पुणे विषारी दारू प्रकरणात मिथेनॉलचा पुरवठा करण्यात सहभागी असलेल्या रेक्स इंटरनॅशनल भिवंडी या संस्थेविरुद्ध आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी धडक कारवाही केली असून ५ हजार २२९ किलो संशयित मिथेनॉल या विषारी द्रव्याचा ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा साठा नमुने चाचणीसाठी घेऊन जप्त केला आहे व गाळा सील करण्यात आला आहे.

परवाने रद्द करण्यास नोटीस बजाविण्यात आली असून मालक श्री अरुण कुमार चौबे व अभिषेख चौबे यांचे विरुद्ध नारपोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र.५२१/२०१६ दाखल करण्यात झाला आहे.

0000

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.८९३/२०१९ दाखल केले असून उच्च

 सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.८९३/२०१९ दाखल केले असून उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला स्टे याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ मध्ये पुढे कायम ठेवण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उक्त विशेष अनुमती याचिके अनुषंगे महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिज्ञापत्र माहे नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल केले असून सन २०११ मध्ये निर्गमित मिथेनॉल या विषारी द्रव्याची विक्री करताना त्यात Colorant Bitterant टाकण्याबाबतची अधिसूचना कायम ठेवण्याबाबत सादर केलेले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ९३७ मेथानाँल विक्री परवाने धारकांच्या तपासण्या करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रातील परवाने धारक आस्थापनेला भेट देऊन विषारी द्रव्यांचे व्यवस्थापण, साठा, वितरण, विक्री इ तपासणी करण्याचे अधिकार आहेत. तपासणीत आढळून येणाऱ्या निरीक्षणानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

विषारी द्रव्याचे आयात, साठवणूक व विक्री या वरील नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या विषारी द्रव्य अधिनियम, १९१९ कायद्यातील तरतुदीनुसार व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ कायदयाअंतर्गत प्राधिकार व अंमलबजावणीचे अधिकार गृह विभागाकडे देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पोलीस आयुक्त पद नसेल तेथे जिल्हा दंडाधिकारी यांना परवाने प्राधिकार देण्यात आले आहेत.

 

विषारी द्रव्ये म्हणून मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव

 विषारी द्रव्ये म्हणून मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव

महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) मधील अनुसुचिमध्ये नमुद विषारी द्रव्याचा वापर औषधांत करणे बंद झाले. त्यानुसार कोणतेही औषधाचे उत्पादक, घाउक किंवा किरकोळ औषधी विक्रेत्यांकडे या द्रव्याची उत्पादन, विक्री किंवा वितरणाकरीता साठवणूक करण्यांत येत नाही किंवा परवाना घेतला जात नाही. त्यामुळे सन १९९२ मध्ये सर्व विषारी द्रव्ये १९७२ अनुसुचीमधून काढून टाकण्यांत आली व केवळ ७ विषद्रव्ये कायम ठेवण्यात आले. 

           मिथेनॉल चा विषारी द्रव्ये म्हणून अनुक्रमांक 7A. मिथेनॉल (Methyl Alcohol) अंतर्भाव दि. २१ जानेवारी २०११ मध्ये करण्यात आला. महाराष्ट्र विषारी द्रव्ये (दुरुस्ती)नियम, 2011 (Maharashtra Poison (Amendment) Rule 2011) च्या नियम १८A२ च्या नियमान्वये दुरुपयोग टाळण्यासाठी मिथेनॉल ची विक्री करण्यापूर्वी त्यात Methylene Carmine Denatonium Saccharide चे मिश्रण करणे अनिवार्य केले होते. मात्र औषधी उत्पादन करण्यासाठी मिथेनॉल च्या विक्रीसाठी ही बाब लागू नव्हती.

या तरतुदीस मुंबई उच्च न्यायालय यांनी याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ द्वारे सदर दोन्ही याचिका २०१९ मध्ये निकाली काढल्या असून याचिका कर्त्यांची विनंती रद्द करण्यात आलेली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.८९३/२०१९ दाखल केले असून उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला स्टे याचिका क्र.२५३५/२०१२ व २१५३/२०१२ मध्ये पुढे कायम ठेवण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उक्त विशेष अनुमती याचिके अनुषंगे महाराष्ट्र राज्यातर्फे प्रतिज्ञापत्र माहे नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल केले असून सन २०११ मध्ये निर्गमित मिथेनॉल या विषारी द्रव्याची विक्री करताना त्यात Colorant Bitterant टाकण्याबाबतची अधिसूचना कायम ठेवण्याबाबत सादर केलेले 

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद § पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

  

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर;

२२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

§  पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई

 

मुंबई, दि. ६ : पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

कायदयातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून २०२६ अखेर एकूण २२६ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच उल्लंघन आढळलेल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधी वनस्पती पासून प्राप्त होणारे विषारी द्रव्यांचा उपयोग औषधांचे उत्पादनात होत असल्याने व सदर विषारी द्रव्ये महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) च्या अनुसूचिमध्ये समाविष्ठ असल्याने सदर नियामाखाली परवाने मंजुरी प्रधिकार १९७७ मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले आहेत. संबधित कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (औषधे) परवाने मंजुरी प्राधिकारी आहेत.

राज्यातील सर्व घाऊक / किरकोळ मेथॉनोल परवाने धारकांनी, विषारी द्रव्ये, १९१९ व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ अंतर्गत नियम व परवान्याच्या अटींचे तंतोतत पालन करावे. नियमांचे उल्लघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल विषारी द्रव्ये अधिनियम व भारतीय न्याय संहिता, २०२३ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यातयेत आहे. औषधांच्या बाबतील बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्ती आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

 

नवी मुंबई,दि.६: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.

हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकामध्ये ८ फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर १२ फुटांचा कांस्य धातूचा अर्धपुतळा (बस्ट) बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील 'आकार आर्ट अँड स्कल्पचर'चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी हे स्थान सांस्कृतिक महत्त्वाचे एक मुख्य केंद्र बनेल यात शंका नाही.

                                                                 000

Featured post

Lakshvedhi