Saturday, 23 May 2026

पद्मश्री

 पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारांचे मुंबईत वितरण

 

·         माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांना रणझुंजार पुरस्कार

·         जीवन गौरव पुरस्काराने पद्मश्री सुरेश वाडकर सन्मानित

 

मुंबई, दि. २२ : सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारतसेच विविध मानाच्या पुरस्कारांचे वितरण प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. इंटरनॅशनल थिएटर अँड स्पोर्ट्स फाउंडेशन (itsf) आणि साईदिशा प्रतिष्ठान मार्फत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला कला, क्रीडा, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

अभिनेते बोमन इराणी यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारप्रदान करण्यात आला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि मुंबई पोलीस दलातील उप आयुक्त बजरंग बनसोडे यांना रणझुंजार पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना 'सेवा रत्न पुरस्कारदेण्यात आला.

महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारसंतोष लक्ष्मण जाधव, डॉ.सायली पालखेडकर, क्रिकेटपटू आयुष म्हात्रे, डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांना प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना आयटीएसएफचा जीवन गौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. 'ज्वेल ऑफ इंडिया अवॉर्ड' क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना प्रदान करण्यात आला.

गायक हर्षद गोळेकर आणि दुहिता गोळेकर, शहजाद अली यांना पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार देण्यात आला. रायझिंग स्टार अवॉर्ड गायक जेटशेन लामा, गायक देवानश्रीया के. यांना देण्यात आला. कला रत्न पुरस्काराने चित्रकार शेखर साने यांना गौरवण्यात आले. सुहाना ग्रुपचे विशाल चोरडिया यांना 'उद्योग रत्न' पुरस्कार देण्यात आले. 

पुरस्कार वितरण सोहळ्यात कालीपुत्र कलिचरण महाराज यांनी शिवस्रोत पठण केले. घाटकोपर येथील विशेष मुलांनी विशेष सादरीकरण केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान मुंबईकर प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माने यांनी सांगितले.

प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. केवळ कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १५ दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार • केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत सहभाग

 आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीमविकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

•              मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय आढावा बैठक

•        एआय आधारित एकात्मिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार

•        केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा बैठकीत सहभाग

 

मुंबई, दि. 22 : राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टीमविकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले.

       मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व  आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, मुख्य सचिव  राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल व सर्व महसूली विभागांचे विभागीय आयुक्त दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. केवळ कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १५ दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

रिक्त पदांची तातडीने भरती होणार

 रिक्त पदांची तातडीने भरती होणार

पशुसंवर्धन विभागाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व पशुपालकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व ग्रामीण स्तरावर पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची असेल तर पशुपालन क्षेत्राचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. 'कृषी दर्जा' मिळाल्यामुळे या क्षेत्राला नवे बळ मिळाले असून, सर्व योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व वेगवान पद्धतीने करण्याचे निर्देश मंत्री पंकजा  मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

पशुपालकांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यावर भर.

नवीन शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.

पशुवैद्यकीय दवाखाने व उपचारांच्या सुविधा आधुनिक करणे.

रिक्त पदांची भरती करून विभागाच्या कामकाजाला गती देणे.

 

"पशुसंवर्धनाला 'कृषी क्षेत्राचा दर्जा' मिळाल्यामुळे आता आमचे पशुपालक व शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होतील. केवळ योजना कागदावर न राहता, त्या शेवटच्या घटकांपर्यंत गतीने पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश मी दिले आहेत. हा विभाग केवळ एक शासकीय विभाग न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक घराचा आर्थिक आधारस्तंभ बनेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी घेतला विभागाचा सखोल आढावा रिक्त पदांची भरती व नवीन योजना गतीने राबवा

 ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी घेतला विभागाचा सखोल आढावा

रिक्त पदांची भरती व नवीन योजना गतीने राबवा

- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. २२ : पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या पशुसंवर्धन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी व पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पशुसंवर्धन विभागाची सविस्तर आढावा बैठक पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी पशुसंवर्धन सचिव रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पशुसंवर्धनाला 'कृषी दर्जा' मिळाल्यानंतरच्या पुढील कार्यवाहीसह, नवीन योजनांची अंमलबजावणी व विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना गतिमान कामाचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन क्षेत्राला नुकताच 'कृषी क्षेत्राचा दर्जा' बहाल करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर पशुपालकांना व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राप्रमाणेच विविध सवलती, कर्ज आणि योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे. या निर्णयाची तळागाळातील पशुपालकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, तसेच तांत्रिक व प्रशासकीय अडचणी कशा दूर करता येतील, याचा सखोल आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने व जनावरांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर देण्यात यावे. शासनाच्या नवीन योजनांची अंमलबजावणी थेट लाभार्थ्यांपर्यंत विनाविलंब पोहोचवण्यासाठी यंत्रणेने अधिक तत्परतेने काम करावे, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी 25 मे पासून विभागीय परिक्षा

 सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी 25 मे पासून  विभागीय परिक्षा

नवी मुंबई दि. 22 (विमाका) :- महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींना संबंधित पदावर कायम करण्यासाठी, तसेच जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावरील पदोन्नती व नामनिर्देशनासाठीच्या विभागीय परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालय (आस्थापना) यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. या परीक्षा दि. 25, 26 आणि 27 मे 2026 रोजी पार पडणार असून, यासाठी नवीन पनवेल येथील एका प्रमुख परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र विकास सेवा सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावरील उमेदवारांच्या स्थिरीकरणासाठीची परीक्षा दि. 25, 26 आणि 27 मे 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत घेतली जाईल. याच सोबतीने जिल्हा परिषद सेवेतील उपलेखापाल पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी आणि नामनिर्देशनाव्दारे थेट नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीची विहित परीक्षा दि. 25, 26 आणि 27 मे 2026 या दोन दिवसांत घेतली जाणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा नवीन पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील "चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय" या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

            या सर्व परीक्षांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संबंधित विभागीय आयुक्तांकडे आधीच रवाना करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना काही कारणास्तव अद्याप परीक्षेचे प्रवेश पत्र प्राप्त झाले नसेल, त्यांनी विनाविलंब आपल्या संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून ते मिळवून घ्यावे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण तारखांची आणि सूचनांची नोंद घेऊन वेळेत परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे यांनी केले आहे.

एसएलबीसी केवळ औपचारिकता राहू नये

 एसएलबीसी केवळ औपचारिकता राहू नये

एसएलबीसी ही केवळ वार्षिक बैठक किंवा छापील अहवालापुरती मर्यादित राहू नये, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एसएलबीसीचा आत्मा आणि उद्देश प्रत्यक्ष कामात उतरला तरच राज्याच्या आर्थिक विकासाला त्याचा खरा फायदा होईल. बैठकीत चांगली कामगिरी करणाऱ्या तसेच कमी कामगिरी करणाऱ्या बँकांची नावे जाहीर करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.


Featured post

Lakshvedhi