रिक्त पदांची तातडीने भरती होणार
पशुसंवर्धन विभागाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व पशुपालकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व ग्रामीण स्तरावर पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची असेल तर पशुपालन क्षेत्राचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. 'कृषी दर्जा' मिळाल्यामुळे या क्षेत्राला नवे बळ मिळाले असून, सर्व योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व वेगवान पद्धतीने करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
• पशुपालकांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण भागातील आर्थिक चित्र बदलण्यावर भर.
• नवीन शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.
• पशुवैद्यकीय दवाखाने व उपचारांच्या सुविधा आधुनिक करणे.
• रिक्त पदांची भरती करून विभागाच्या कामकाजाला गती देणे.
"पशुसंवर्धनाला 'कृषी क्षेत्राचा दर्जा' मिळाल्यामुळे आता आमचे पशुपालक व शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होतील. केवळ योजना कागदावर न राहता, त्या शेवटच्या घटकांपर्यंत गतीने पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. विभागातील रिक्त पदे तातडीने भरून प्रशासकीय कामाला गती देण्याचे व ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश मी दिले आहेत. हा विभाग केवळ एक शासकीय विभाग न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक घराचा आर्थिक आधारस्तंभ बनेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment