Wednesday, 20 May 2026

चीज ॲनालॉग’ बाबत काटेकोर अंमलबजावणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश · राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दहा दिवसात १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी

 चीज ॲनालॉगबाबत काटेकोर अंमलबजावणीचे

 अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

·         राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दहा दिवसात १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी

·          

मुंबई, दि.१९ : हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर चीज ॲनालॉगचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर चीज ॲनालॉगबाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत.

            १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत पहिल्या दहा दिवसात १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. मंत्री झिरवाळ यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने घेतली आहे. त्यामुळे शुद्ध पनीरसाठी महाराष्ट्राने दाखवलेली दिशा आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४६ गावांपैकी ७०४ गावांना मोबाईल कव्हरेज असून ६७७ गावांमध्ये ४जी सुविधा उपलब्ध

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४६ गावांपैकी ७०४ गावांना मोबाईल कव्हरेज असून ६७७ गावांमध्ये ४जी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले तर रत्नागिरी जिल्ह्यातील १५३८ गावांपैकी १४७२ गावांमध्ये मोबाईल कव्हरेज आणि १४६१ गावांमध्ये ४जी सेवा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. अनेक अनकव्हर्ड गावांचा समावेश भारत संचार निगमच्या ४जी सॅच्युरेशन प्रकल्पात करण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्वच भागात उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हीटीसाठी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करून कोणती गावे सॅच्युरेशन प्रकल्पात समाविष्ट करायची, कोणत्या ठिकाणी नवीन टॉवर आवश्यक आहेत आणि काम किती कालावधीत पूर्ण होणार याचा सविस्तर रोडमॅप तयार करण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.  यास भारत संचालक निगमचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख पाटील यांनी या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन अंतिम कृती आराखडा सादर करण्याचेही निर्देश मंत्री ॲङ शेलार यांनी 

कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण

 कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. १९ : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी,  भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि ४जी सुविधांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस चिपळूणचे आमदार शेखर निकम, महाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित निवासी जिल्हाधिकारी,  भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते.

या बैठकीत देवरुखसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याची समस्या आमदार शेखर निकम यांनी मांडून प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नेटवर्कच उपलब्ध नसल्याचे सांगितले. डोंगराळ भागांमध्ये नेटवर्कची गंभीर समस्या कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर मंत्री ॲड. शेलार यांनी प्रत्येक तालुक्यात ‘कनेक्टिव्हिटी दरबार आयोजित करण्याची संकल्पना मांडली. या उपक्रमात भारत संचार निगमचे अधिकारी, स्थानिक आमदार, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी होऊन प्रत्यक्ष समस्यांची नोंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

 जागतिक संगीत दिनानिमित्त आरोहीयुवा संगीत महोत्सवाचे आयोजन

रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

वाद्यसंगीताची अनोखी मैफल युवा कलाकारांना व्यासपीठ

 

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त आरोही अ फेस्टिव्हल ऑफ रायझिंग स्टार्स या विशेष सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रेस फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव युवा आणि होतकरू संगीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे.

२००२ पासून सुरू असलेल्या आरोही’ या संगीत महोत्सवाने गेल्या २४ वर्षांत १३८ हून अधिक युवा संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, गायन आणि वाद्यसंगीताच्या परंपरेला प्रोत्साहन देत नवोदित कलाकारांना प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

हा संगीत महोत्सव बुधवार, २० मे २०२६ आणि गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथील मिनी थिएटरमध्ये रंगणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांसाठी ही एक विशेष सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

कसं काय?' या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता

 'कसं काय?' या मोहिमेच्या माध्यमातून लोकसहभाग, स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली आणि ग्रामस्तरावरील आरोग्य सक्षमीकरणाचा संदेश अत्यंत प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे. 'कसं काय?' हे गाणे केवळ प्रचारगीत न राहता, ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य जनजागृतीचे प्रतीक बनेल, असा विश्वास मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आला.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी 'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 वृत्त 1797

माझं गाव, आरोग्यसंपन्न गावअभियानाच्या जनजागृतीसाठी

'कसं काय?' मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

 

मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझं गाव, आरोग्यसंपन्न गावअभियानाच्या जनजागृतीसाठी कसं काय?’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. या निमित्ताने कसं काय?’ या जनजागृतीपर गाण्याचे तसेच पोस्टर्सचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

 ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून माझं गाव, आरोग्यसंपन्न गावहे अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या

 कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या

-         जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबई, दि. १९ : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रस्तावित कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

 

 मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक पार पडली. कृष्णा उपखोऱ्यातील पुराचे पाणी भीमा उपखोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरनियंत्रणासोबतच दुष्काळी भागांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व असाधारण असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामांचाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, प्रशासकीय मान्यता आणि पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केल्या.

 

बैठकीस ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते तसेच संबंधित विभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीने उपस्थित होते. पूर नियंत्रण आणि जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने या बैठकीत बैठक महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

Featured post

Lakshvedhi