समृद्ध महाराष्ट्र : सीएसआरच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता वृद्धी” या विषयावरील चर्चासत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे, शिव नाडर फाउंडेशनचे रॉबिन सरकार, ईवाय इंडिया चे हरीश पोरवाल तसेच सिस्को इंडियाचे नितीन भाटिया सहभागी झाले होते. या पॅनल चर्चेचे सूत्रसंचालन महाआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान पाटील यांनी केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 20 May 2026
समृद्ध महाराष्ट्र : सीएसआरच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता वृद्धी” या
समृद्ध महाराष्ट्र : सीएसआरच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता वृद्धी” या विषयावरील चर्चासत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे, शिव नाडर फाउंडेशनचे रॉबिन सरकार, ईवाय इंडिया चे हरीश पोरवाल तसेच सिस्को इंडियाचे नितीन भाटिया सहभागी झाले होते. या पॅनल चर्चेचे सूत्रसंचालन महाआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान पाटील यांनी केले.
समृद्ध महाराष्ट्र’साठी शिक्षण, कौशल्यविकास आणि सीएसआर उपक्रमांची सांगड आवश्यक · ग्रामीण भागापर्यंत डिजिटल शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यावर भर
समृद्ध महाराष्ट्र’साठी शिक्षण, कौशल्यविकास आणि सीएसआर उपक्रमांची सांगड आवश्यक
· ग्रामीण भागापर्यंत डिजिटल शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यावर भर
मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाश्वत रोजगारनिर्मिती आणि कौशल्याधारित विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे. उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य, भविष्योन्मुख कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण, ग्रामीण भागातील विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणाली यांसारख्या विषयांवर या चर्चेत सखोल मंथन झाले. मुंबई, पुणे आणि नाशिकपुरता विकास मर्यादित न राहता गडचिरोली, भामरागड यांसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यावर‘टेक महाइम्पॅक्ट 2026’ परिषदेत सर्व वक्त्यांनी मत व्यक्त केले.
महाआयटीच्या विविध आयसीटी उपक्रमांमुळे
तेजस नेटवर्क्सचे उपाध्यक्ष (विक्री) सुनील हंडू यांनी महाआयटीच्या विविध आयसीटी उपक्रमांमुळे महाराष्ट्र डिजिटल प्रशासनात अग्रणी राज्य म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले. या उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि भविष्योन्मुख अभियंता मनुष्यबळ घडविण्यासाठी कंपनी आपले तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी
महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजिटल महाराष्ट्र’ या आधुनिक आणि सर्वसमावेशक संकल्पनेच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीएसएनएल ४जी/५जी, भारतनेट, नॅशनल नॉलेज नेटवर्क तसेच संरक्षण आणि सार्वजनिक नेटवर्क प्रकल्पांमध्ये तेजस नेटवर्क्सचा मोठा अनुभव असल्याने ही भागीदारी राज्यासाठी लाभदायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
तेजस नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अर्नोब रॉय यांनी सांगितले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानात प्राविण्य असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण अभियंत्यांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची कंपनीची बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये
सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार
मुंबई, दि. २० : राज्यातील टियर-२, टियर-३ आणि वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित ‘टेकमहा इम्पॅक्ट २०२६’ परिषदेत करण्यात आला.
या कराराअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग-शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी यांसाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.
जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. गेली अनेक वर्षे सौर आणि पवन ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. गेली अनेक वर्षे सौर आणि पवन ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा हीच भविष्यातील ऊर्जा समस्या सोडवेल, अशी धारणा होती. मात्र आता वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे स्थिर व सातत्यपूर्ण वीज निर्मितीची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. महाराष्ट्र सौर आणि पवन उर्जेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असला तरी कार्बनमुक्त आणि औद्योगिक स्तरावरील बेसलोड ऊर्जा पुरवठ्यासाठी न्यूक्लिअर ऊर्जा अत्यावश्यक ठरणार आहे. महाराष्ट्र हा ६६० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य असून भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येते. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात देशातील जवळपास ६० टक्के डेटा सेंटर क्षमता केंद्रित आहे. आगामी काळात सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे वीजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...